खेल
विराटच माझा विक्रम मोडू शकतो, कुमार संगकाराला विश्वास
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अद्यापपर्यंत एकही शतक झळकवलेले नाही. पण विराट कोहलीच आपला सलग चार शतकांचा विक्रम मोडू शकतो असा कुमार संगकाराला विश्वास आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कुमार संगकाराने सलग चार शतके झळकावली होती.
उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले नसते तर त्या विश्वचषकात सर्वाधिक धावांची नोंद कुमार संगकाराच्या नावावर असती. कुमार संगकाराला अन्य कुठल्या फलंदाजापेक्षा विराट कोहलीवरच विश्वास आहे. विराटच हा विक्रम मोडू शकतो असे संगकाराचे मत आहे. विराटने या स्पर्धेत सलग पाच अर्धशतके झळकवली आहेत. वर्ल्डकपमध्येच विराटने वनडेमध्ये ११ हजार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा ओलांडला.
पण त्याला अर्धशतकांना शतकी खेळीमध्ये बदलणे जमलेले नाही. २०१५ वर्ल्डकप स्पर्धेत संगकाराने बांगलादेशविरुद्ध नाबाद (१०५), इंग्लंड विरुद्ध नाबाद (११७), ऑस्ट्रेलिया विरुद्ध (१०४) आणि स्कॉटलंड विरुद्ध (१२४) धावांची खेळी केली होती. संगकाराच्या आधी मार्क वॉ, मॅथ्यु हेडन आणि सौरव गांगुली यांनी एकाच वर्ल्डकपमध्ये तीन शतके झळकवली होती. पण कोणालाही सलग शतके झळकवणे जमले नव्हते. कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध (८२), पाकिस्तान विरुद्ध (७७), अफगाणिस्तान विरुद्ध (६७), वेस्ट इंडिजविरुद्ध (७२) आणि इंग्लंड विरुद्ध (६६) धावांची खेळी केली आहे. याआधीच्या दोन वर्ल्डकपमध्ये २०११ आणि २०१५ मध्ये विराटने बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध शतके झळकवले आहे. पण कर्णधार म्हणून त्याला शतक करणे जमलेले नाही.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.