मनोरंजन
स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!
- 262 Views
- July 06, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!
- Edit
सोशल मीडियावर सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळतेय. पायाने पहिल्याच प्रयत्नात बाटलीचं झाकण उडवायचं असं काहीसं हे चॅलेंज आहे. ऐकायला जरी हे सोपं वाटत असलं तरी करायला मात्र ते तितकंच अवघड आहे. बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हे आव्हान स्वीकारलंय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनीही हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण यात थोडी गंमत आहे.
‘जिवलगा’ मालिकेतील काव्या म्हणजेच अमृता खानविलकरने हे चॅलेंज एका झटक्यात पूर्ण केलं तर तिकडे निखिल आणि विश्वास म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्निल जोशीने अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर हे व्हिडीओ पोस्ट केले असून नेटिझन्सनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
या व्हिडीओत स्वप्नीलने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी समोर बॉटल ठेवली आणि गोल फिरून त्याचं झाकण उडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच सिद्धार्थने पाणी पिण्यासाठी ती बॉटल उचलली. हे पाहून स्वप्नील दंगच राहिला. आपण चुकलोय हे लक्षात येताच सिद्धार्थने ती बॉटल पुन्हा जागेवर ठेवली. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.