देश
अजित पवार ‘PubG’च्या जाळ्यात
आम्ही अजित पवार म्हटल्यावर आपल्याला धक्का बसला असेल परंतु हे अजित पवार राजकारणातील अजित पवार नसून पुणे जिल्ह्यातील चाकण मध्ये सध्या वास्तव्यास असलेले उच्चशिक्षित तरुण असून हे मूळचे इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी गावचे रहिवासी आहेत. या अजित पवार महाशयांचा राजकारणातील अजित दादांशी काहीही सबंध नसून यांचे नाव फक्त अजित दादांसारखे सेम आहे…चाकण मधील अजित पवार हे पब्जी गेम च्या आहारी गेल्या ने पब्जी गेम सारखेच सामान्य आयुष्यात वागू लागले आहेत.
या महाशयांना पब्जी गेम मध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने पब्जी गेम मध्ये दिल्या जाणाय्रा कमेंट्सचा वापर या अजित पवारांनी आपल्या सामान्य आयुष्यात केला.या तरूणाने चक्क चाकण च्या रस्त्यावरती जाऊन पब्जी गेम मध्ये येणारे कमेंट नागरिकांना वापरल्या.. त्यामुळे पब्जी गेम ने अजित पवारांचे मनोधैर्य खचले असून ते आता मानसिक मनोरुग्ण झाले आहेत.
त्यामुळे पालकांनो सावधान आपली मुले दिवसभर काय करतात मोबाईल वरती कुठल्या गेम खेळतात कोणाशी बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज असून आपणच आपल्या मुलांची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.
देशात सध्या ब्लू वेल, ब्लॅक पॅंथर यांसारख्या गेममुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याने आता सरकारने पब्जी गेम वर्ती ही काहीतरी निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली असून येत्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकार अशा गेम वरती काय निर्बंध घालतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे..
परिणामी, आजच्या स्मार्ट जगात तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचे फायदे आज प्रत्येकाला होत आहेत. पण याचा वापर किती करावा, कसा करावा की मनोरूग्ण होईपर्यंत करावा हे फक्त आपल्या हातात आहे. त्यामुळे घरात मुलं किती मोबाईलचा वापर करतात आणि कशासाठी करतात याकडे पालकांचे लक्ष हवं.