Menu

राजनीति
दंगलीवर माफी न मागणारे मोदी पंतप्रधानपदासाठी अयोग्य – इकॉनॉमिस्ट

nobanner

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. ४ – नरेंद्र मोदी हे काँग्रेसपेक्षा सरस असतील, काँग्रेसच्या नेत्यांसारखे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे डाग नाहीत पण पंतप्रधानपदासाठी ते अयोग्य असल्याचे परखड मत ‘द इकॉनॉमिस्ट’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने मांडले आहे. गुजरात दंगलीविषयी साधा खेदही व्यक्त न करणा-या या नेत्याकडे सर्व धर्म समभाव असलेल्या देशाची जबाबदारी कशी द्यायची असा प्रश्नही या वृत्तपत्राने उपस्थित केला आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘द इकॉनॉमिस्ट’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने मोदींविषयी एक लेख छापला आहे. यात मोदींच्या गुजरातच्या विकास मॉडेलचे भरभरुन कौतुक केले आहे. काँग्रेसच्या काळात देशाचा विकास दर ५ टक्क्यांवर घसरला. काँग्रेसच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे डाग आहेत. या तुलनेत मोदी स्वच्छ असून त्यांनी गुजरातचा विकास केल्याचे या लेखात म्हटले आहे. मोदी हे भ्रष्टाचारी नसतीलही पण सत्तेत आल्यावर मोदी आणि राहुल गांधी यांची काँग्रेस यांच्यात फारसा फरक राहणार नाही असे स्पष्ट मत या वृत्तात मांडण्यात आले आहे. १९९० मध्ये अयोध्येवरील विराट मोर्च्याचे आयोजन करणारे