Menu

देश
धक्कादायक! मुंबईवर पुन्हा घोंगावतंय चक्रीवादळाचं संकट

nobanner

कोरोना आणि अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. हे असंच सुरू राहिल्यास आणि समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचे संकट गडद होणार आहे.

एका अहवालातून याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर 2050 पर्यंत या पातळीत झालेल्या वाढीमुळे सुमारे पाच हजार कोटी एवढे नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली.

इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुस-या भागात ही भीती व्यक्त केली. त्यामुळे वेळीच खबरदारी बाळगून उत्सर्जन कमी करणं गरजेचं आहे.

आता सुरू असलेला बहुप्रतीक्षित कोस्टल रोड प्रकल्पही या चक्रीवादळात सापडू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेचं काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी काही अत्यावश्यक उपाययोजना करणं गरजेचं आहे.

ग्रीन पायाभूत सेवा सुविधा वाढवणं गरजेचं आहे. याशिवाय समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने कांदळवनांचे संवर्धन करणं गरजेचं आहे. ज्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. शहरी हिरवाईवर अधिक लक्ष केंद्रीत करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नद्यांचं संवर्धन करणं आवश्यक आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.