Menu

देश
गणपती विसर्जनासाठी गेलेले भाजप आमदार नदीत पडले

nobanner

गणपती विसर्जनासाठी गेलेले भाजप आमदार नदीत पडले
कोल्हापूर : गणपती विसर्जनासाठी तराफ्यातून गेलेले आमदार सुरेश हळवणकर थेट नदीत पडले. तराफा उलटल्याने ही घटना घडली. मात्र सुरक्षा रक्षकांनी तातडीने आमदार हळवणकर यांच्यासह दहा जणांना सुरक्षित बाहेर काढलं.

सुरेश हळवणकर हे भाजपचे इचलकरंजीचे आमदार आहेत. आज घरगुती गणपती विसर्जनासाठी आमदार हळवणकर यांच्यासह दहा जण तराफ्यातून पंचगंगा नदीत उतरले होते. मात्र तराफा उलटल्याने सर्वजण नदीपात्रत कोसळले.

त्याचवेळी सुरक्षरक्षकांनी तातडीने नदीपात्रात धाव घेऊन सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं.