पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा ‘या’ बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल
पाचनसंस्था कमकुवत असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. यामुळं पोट सकाळी नीट साफ होत नाही. पोट साफ झालं नाही तर दिवसभर चिडचिड होते. अशावेळी घरगुती उपायांनी तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता. सब्जाच्या बियांमध्ये अनेक लाभदायक गुण असतात. जे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. बद्धकोष्ठतेवरही सब्जाच्या बिया गुणकारी असतात.
सब्जाच्या बियांमध्ये हाय फायबर, पोटॅशियम, मॅग्नीशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असे गुण असतात. या तत्वांमुळं तुमची पाचन प्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून तुम्हाला आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी रात्रभर सब्जाच्या बियांचे सेवन करणे चागंले. सब्जांच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर ते फुलल्यानंतर तुम्ही ते दुधात टाकून त्याचे सेवन करु शकता.
रात्रीच्या वेळी सब्जाच्या बियांचे तुम्ही सेवन केल्यास सकाळी तुमचं पोट एकदम साफ होईल. हवंतर तुम्ही सकाळी उपाशीपोटीही सब्जाच्या बिया खाऊ शकतात.
सब्जाच्या बियांमध्ये फायबर असते त्यामुळं तुमची पाचनसंस्था अधिक मजबूत बनते. त्याचबरोबर पाचन पक्रियादेखील सुधारते.
सब्जाच्या बियांमध्ये फायबर असते त्यामुळं तुमची पाचनसंस्था अधिक मजबूत बनते. त्याचबरोबर पाचन पक्रियादेखील सुधारते.