Menu

खेल
Live Cricket Score of India vs England, 1st Test, Day 1

nobanner

गुजरातच्या राजकोट मैदानावर इंग्लडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या कर्णधार विराट कोहलीला नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सलामीवीर जोडी अलिस्टर कूक आणि हमीद यांनी सावध सुरूवात केली होती. सामन्याच्या १६ व्या षटकात रवींद्र जडेजाने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. अलिस्टर कूक २१ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. दुसऱया बाजूने हमीद आपल्या पदापर्णाच्या कसोटीत चांगली फलंदाजी करत होता. हमीदला अश्विनने ३१ धावांवर पायचीत करून माघारी धाडले. उपहारापूर्वीच्या अखेरच्या षटकात अश्विनने भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले. बेन डकेट अश्विनच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेकरवी स्लिपमध्ये झेलबाद होऊन माघारी परतला आहे. रहाणेने डकेटचा अप्रतिम झेल टीपला. उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ३ बाद १०२ धावा अशी आहे. जो रुट सध्या नाबाद ३० धावांवर खेळत आहे.
या सामन्यात डीआरएस प्रणालीचा प्रथमच वापर केला जाणार आहे. भारतातील द्विराष्ट्रीय मालिकेत प्रथमच प्रायोगिक स्वरूपात ही तंत्रज्ञान पद्धती वापरण्यात येणार आहे देशात ‘डीआरएस’ प्रणाली लागू करणारे राजकोट हे पहिले कसोटी केंद्र ठरणार आहे. पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारे हे देशातील पहिले स्टेडियम आहे.