देश
नोटाबंदीच्या काळात किती रक्कम जमा केली ? नव्या विवरणपत्रात द्यावी लागणार माहिती
नवे प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करताना आता तुम्हाला नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती द्यावी लागणार आहे. नवे विवरण पत्र २०१७-१८ साठी उपलब्ध असेल. कर विभागात गतवर्षी ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या नोटाबंदीच्या काळात एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती देण्यासाठी एक नवा रकाना तयार करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवा रकाना हा पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर-१ किंवा ‘सहज’ अर्जही जोडण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीच्या काळात अघोषित संपत्तीची माहिती देण्यासाठी ‘ऑपरेशन क्लीन मनी’ आणि ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ (पीएमजीकेवाय) संधी दिली होती. आता विवरण पत्राच्या नव्या रकान्याच्या माध्यमातून बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंबंधी माहिती घेण्यात येणार आहे.
नोटाबंदीच्या काळात किती रक्कम भरण्यात आली होती, हे या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांनी कमी रक्कम भरली आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली नसल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नव्या विवरण पत्रात आधार क्रमांक देण्यासाठीही रकाना असणार आहे. गतवर्षी आधार क्रमांक देणे एेच्छिक होते. या वर्षी मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. आधारच्या वापरामुळे विवरण पत्राचे इ-व्हेरिफिकेशन जारी राहते, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.
आयटीआर-१ किंवा ‘सहज’ अर्जाची रचना करदात्यांसाठी सोपी बनवली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये सर्व वजावट, संपत्ती आणि देणे याबाबत माहिती भरण्यासाठी सर्व रकाने एकत्रित करण्यात आले आहेत. आयटीआर अर्ज १ एप्रिलपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागात नऊ वेगवेगळे आयटीआर अर्ज एकत्रित जारी केली जाण्याची शक्यता आहे. करदात्यांसाठी ३१ जुलैपर्यंत विवरणपत्र भरता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.