देश
विश्वनाथ महाडेश्वर यांना 171 नगरसेवकांचा पाठिंबा
मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीसोबतच सभागृह नेत्याचीही निवड होणार आहे.
सत्ताधारी पक्ष म्हणजेच शिवसेनेचाच सभागृह नेता होणार हे जवळपास निश्चित आहे.
मुंबई : शिवसेनेचे 88 नगरसेवक + भाजपचे 83 नगरसेवक, एकूण 171 नगरसेवकांचा विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबाभाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार मुमताझ खान यांनी सेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाहीपहिल्या दिवसापासून सांगत होतो, एका घरातले दोन भाऊ कितीही भांडले तरी घरातील कार्याला दोघे भाऊ एकत्र येतात- चंद्रकांत पाटीलमुंबई : निवडणूक प्रक्रिया सुरु, भाजप नगरसेवकांचा शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा; सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीतमहापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक गैरहजर, पक्षाकडून निरोप न आल्याने नगरसेवक कार्यालयातचपक्षाकडून निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही याबाबत कोणताच निरोप न आल्यानं मनसेचे नगरसेवक सभागृहात आले नाहीतसमाजवादी पक्षाचे सर्व सहाही नगरसेवक सभागृहात हजर
शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाच सभागृह नेतेपदी नेमले जाईल हे आता निश्चित झाले आहे.
यासोबतच, स्थायी, सुधार, शिक्षण, आरोग्य या समित्यांच्या सदस्यांची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईचं महापौरपद शिवसेनेलाच मिळाल्याने, शिवसेना जंगी सेलिब्रेशन करणार आहे. ही संधी हेरुन शिवसेनेनं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली. वरळी सी-लिंकवरुन उद्धव ठाकरे यांची एक रॅली निघणार आहे. ही रॅली मुंबई महापालिकेत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईकरांचे आभार मानतील आणि त्यानंतर हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्त्यांना अभिवादन करणार आहेत.
महापौरपदासाठी महाडेश्वर मैदानात
शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदासाठी, तर हेमांगी वरळीकर या उपमहापौरपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. भाजपनं आधीच या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित आहे.
औपचारिकता म्हणून महापौरपदासाठी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे आणि उपमहापौरपदासाठी विन्नी डिसूजा यांनीही अर्ज दाखल केले आहेत. पण, एकूण 88 जणांचा गट असल्यानं शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित आहे.
दरम्यान, त्याचवेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पालिका घराचा वाद बाहेर आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला, तर त्यांचं महापौरपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.