देश
‘वंदे मातरम्’वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम्’ सुरु असताना दोन नगरसेवक उभं न राहिल्यानं गोंधळ उडाला. या दोन्ही नगरसेवकांवर महापौरांनी एका दिवसासाठी निलंबनाची कारवाई केलीय.
महापालिकेत वंदे मातरम् सुरू असताना एमआयएमचे सय्यद मतीन आणि काँग्रेसचे सोहेल शेख हे दोघेही उभे राहिले नाहीत. यावरुन शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांसमोरील वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. आणि दोन्ही नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली.
विशेष म्हणजे, याप्रसंगी सेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याचंही समजतं आहे. यावेळी एमआयएमचे नगरसेवक शेख जफर यांनी महापालिका सभागृहात तोडफोड केली.
त्यामुळे महापालिकेतील या अभूतपूर्व गोंधळानंतर एआयएमचे नगरसेवक शेख जफर याचं एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तसेच जफरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट करताना, राष्ट्रगीताचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच मतीन यांच्या कृतीबद्दल त्यांना जाब विचारणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.