Menu

देश
हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजरचा खात्मा

nobanner

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश मिळालेलं आहे. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजर याचा खात्मा करण्यात आला आहे.

भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांसोबत अब्दुल कयूम नजर याचाही समावेश होता. मंगळवारी अब्दुल कयूम नजर याचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं.

अब्दुल कयूम नजर याच्यावर काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिद्दीनची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळण्यासाठी तो काश्मीर खोऱ्यात दाखल होण्यासाठी आला होता.

नजर याचा खात्मा ही भारतीय सैन्याची मोठी कारवाई मानलं जात आहे. नजर याच्यावर ५०हून अधिक प्रकरणात सुरक्षा दलं त्याच्या मागावर होतं. सोपोर येथे पोलिसांच्या हत्ये प्रकरणातही तो फरार होता. नजरला पकडून देणाऱ्याला १० लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.

२००३ साली हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर अब्दुल माजिद डार याचा खात्मा झाल्यानंतर अब्दुल कयूम नजर हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय झाला होता.