Menu

अपराध समाचार
कर्नलच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध; ब्रिगेडिअरचे कोर्ट मार्शल, सश्रम कारावास

nobanner

कर्नलच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपी ब्रिगेडिअर दोषी ठरला असून त्याचे कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे. दोषी ब्रिगेडिअरला आपले पद आणि सेवानिवृत्तीच्या लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये ब्रिगेडिअरला या प्रकरणात दोषी ठरवत लष्कराने जनरल कोर्ट मार्शल (जीसीएम) अंतर्गत मोठी कारवाई केली होती. आरोपीची चार वर्षांपर्यंत फक्त पदोन्नतीच रोखली नव्हती तर न्यायालयाने त्याला फटकारलेही होते.

न्यायालयाच्या आदेशामुळे ब्रिगेडिअरला आपली ज्येष्ठता गमवावी लागली होती. जेव्हा हा ब्रिगेडिअर पश्चिम बंगाल मधील सुकना येथे ३३ कॉर्प्समध्ये चीनविरोधातील एका मोहिमेसाठी पहाड इन्फंट्रीचे नेतृत्व करत होता, तेव्हाची ही घटना आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रिगेडिअरवर करण्यात आलेल्या कारवाईवर लष्कराच्या मुख्यालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली असून जीसीएमने दिलेल्या शिक्षेवर पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले आहे.

ब्रिगेडिअरच्या पत्नीने लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ब्रिगेडिअरच्या अनैतिक संबंधाची तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. ब्रिगेडिअरच्या पत्नीने जीसीएमचे नेतृत्व करत असलेल्या मेजर जनरल आणि सहा अन्य ब्रिगेडिअर्सना आरोपीचे कर्नलच्या पत्नीबरोबरचे झालेले व्हॉट्सअप संदेश दाखवले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकाऱ्याने न्यायालयात आपल्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले होते. त्यामुळे त्याला सौम्य शिक्षा सुनावण्यात आली. तर दुसरीकडे लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते. पण आरोपीने गुन्हा मान्य केल्याने थोडी कमी शिक्षा देण्यात आली.