Menu

अपराध समाचार
गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणून दलित तरुणाला मारहाण

nobanner

गुजरातमध्ये पुन्हा एकदा जातीय द्वेषाचं प्रकरण समोर आलं आहे. मेहसाणा जिल्ह्यात स्वतःच्या दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणून येथे एका दलित युवकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. वीरसंघ झाला(१९), रानूभा झाला(२०), रामजी झाला(३७), विक्रमसिंह झाला(१९) , दनभा झाला(२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. जनसत्ताने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहसणा जिल्ह्यातील अकबा गावात हा प्रकार घडला . येथे जयदेव परमार नावाच्या तरुणाने आपल्या दुचाकीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता. परमारने केलेल्या तक्रारीनुसार, गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावल्यापासूनच गावातील एक गट त्याला त्रास देत होता. कुटुंबातील ७० वर्षांच्या ज्येष्ठ महिला चंचल परमार यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबतही मारहाण करण्यात आली.

दोघांनाही सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय दलित मंचाचे कार्यकर्ता रमेश परमार यांनी मेहसाणा जिल्ह्यामध्ये दलितांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचं म्हटलं आहे. विठ्ठलपूर येथेही काही दिवसांपूर्वी दलित तरुणाला मारहाण करण्यात आली होती. रणतेज गावातील एका धार्मिक कार्यक्रमात जेवणासाठी दलितांना वेगळ्या रांगेत उभं करण्यात आलं होतं, असं परमार म्हणाले. बहुचरा जी तालुक्यात दलित तरुणांना घोड्यावरुन वरात काढण्याची परवानगी नाही, तेथे दलितांना मंदिरातही जाऊ दिलं जात नाही किंवा सार्वजनिक स्मशनभूमीचा वापरही त्यांना करु दिला जात नाही, असा आरोप रमेश परमार यांनी केला आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.