अपराध समाचार
भांडूप उड्डाणपूलावर होंडा सिटी कार कंटेनरला धडकली, दोघांचा मृत्यू
- 236 Views
- June 30, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on भांडूप उड्डाणपूलावर होंडा सिटी कार कंटेनरला धडकली, दोघांचा मृत्यू
- Edit
nobanner
भांडूप उड्डाणपूलावर शनिवारी सकाळी होंडा सिटी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. होंडा सिटी कार ठाण्याच्या दिशेने जात असताना ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपूलावर हा अपघात झाला. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्ता दुभाजक ओलांडून समोरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धडकली.
कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गाडीतील सर्व जण २० ते २२ वयोगटातील होते. महेश आणि चिकू अशी दोन मृतांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. हेमंत शिव गुंडे, निहार कोडे आणि अक्षय मोरे हे तिघे जखमी झाले असून त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. MH04 HU 0072 हा अपघातग्रस्त होंडा सिटी कारचा नंबर आहे.
Share this: