Menu

देश
आरक्षणासाठी मराठा बांधवांचे २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण

nobanner

आरक्षणाच्या मागणीसाठी २० ऑगस्टपासून मराठा बांधवांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ९ ऑगस्टला जे आंदोलन करण्यात आले त्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्यामुळे यापुढचे आंदोलन रस्त्यावर होणार नाही अशी घोषणा याआधीच करण्यात आली होती. त्यानुसार आता मराठा बांधवांनी आरक्षण आणि इतर सर्व प्रमुख मागण्यांसाठी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.