देश
चकमकीत 3 दहशतवादी ठार, एक जवान शहीद
- 356 Views
- May 16, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on चकमकीत 3 दहशतवादी ठार, एक जवान शहीद
- Edit
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दलीपोरा परिसरात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. मात्र, चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान देखील शहीद झाला आहे. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाल्याचंही समजतंय. दरम्यान, याठिकाणी शोधमोहिम अद्यापही सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दलीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त पथकाला मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे जवानांनी या परिसराला घेरलं आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाचा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आणि चकमकीला सुरूवात झाली. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
यापूर्वी रविवारी(दि.१२) दक्षीण काश्मीरमधील शोपियानमध्येही दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. हे दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.