Menu

चाचण्यांचे अंदाज किती बरोबर, किती चूक?

nobanner

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एन.डी.ए.) सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, या चाचण्यांनी एनडीएला दिलेल्या किमान आणि कमाल जागांमध्ये २४२ ते ३५० इतकी तफावत आहे.

काँग्रेस आघाडीच्या संभाव्य जागांमध्ये ८२ ते १६४ तर, अन्य पक्षांच्या जागांमध्ये ९७ ते १३८ इतका फरक आहे. या चाचण्यांमधून निकालाची दिशा स्पष्ट होत असली तरी त्यांचे अंदाज अचूक ठरतीलच असे नाही. गेल्या पंधरा वर्षांतील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यास मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरल्याचे दिसते. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या अंदाजात भाजप आघाडीला दिलेल्या जागा आणि प्रत्यक्ष निकालात किमान ४० ते कमाल १६४ जागांची तफावत दिसते.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप आघाडीला २४८ ते २७५ जागा दिल्या होत्या आणि वाजपेयी सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात केंद्रात काँग्रेस आघाडीचे ‘यूपीए-१’चे सरकार स्थापन झाले. काँग्रेस आघाडीला २२२ जागा मिळाल्या होत्या पण, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये १८६ ते २०५ जागा देण्यात आल्या होत्या. १९९८ मध्ये मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारा असला तरी भाजप व काँग्रेस आघाडीलाही अंदाजापेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. १९९९ मध्ये चाचण्यांनी भाजप आघाडीला तीनशेहून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता पण, एनडीएला २९६ जागांवर समाधान मानावे लागले.

महाआघाडी फोल -राम माधव

लोकसभेची निवडणूक सुरू होण्याआधीच विरोधकांच्या महाआघाडीचा प्रयोग फसला होता. काही पक्षांनी महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न जरूर केला पण, एकाही राज्यात महाआघाडीचा प्रभाव दिसला नाही.

निकालानंतर विरोधी पक्षांची आघाडी बनण्याची शक्यता नाही, असे पक्षाचे महासचिव राम माधव यांचे म्हणणे आहे.

२३ मे पर्यंत वाट पाहा – थरूर

विरोधकांनी मात्र मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेटाळले आहेत. गेल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियात झालेल्या निवडणुकीबाबत ५६ मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरले होते. मत कोणाला दिले हे भारतातील मतदार खरे सांगतातच असे नाही. त्यामुळे निकालाच्या दिवसापर्यंत (२३ मे) थांबणे हेच उचित ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस ननेते शशी थरूर यांनी दिली.

१९९८

वाहिनी-एजन्सी एनडीए+ काँग्रेस+ अन्य

आऊटलूक-एसी नीलसन २३८ १४९ १५६

डीआरएस २४९ १५५ १३९

फ्रंटलाइन-सीएमएस २३५ १५५ १८२

इंडिया टुडे-सीएसडीएस २१४ १६४ १६५

प्रत्यक्ष निकाल २५२ १६६ १९९

१९९९

वाहिनी-एजन्सी एनडीए+ काँग्रेस+ अन्य

इडिया टुडे-इनसाइट ३३६ १९० १०५

एचटी-एसी नीलसन ३०० २०५ १२०

आऊटलूक-सीएमएस ३२९ १८६ ९८

टाइम्स नाऊ-डीआरएस ३३२ १३८ —

प्रत्यक्ष निकाल २९६ १३४ ११३

२००४

वाहिनी-एजन्सी एनडीए काँग्रेस+ अन्य

आजतक-ओआरजी २४८ १९० १०५

एनडीटीव्ही-एसी नीलसन २५० २०५ १२०

स्टार न्यूज सी व्होटर २७५ १८६ ९८

प्रत्यक्ष निकाल १८९ २२२ १३२

२००९

वाहिनी-एजन्सी एनडीए काँग्रेस+ अन्य

स्टार न्यूज-एसी नीलसन १९७ १९९ १३६

टाइम्स नाऊ १८३ १९८ १६२

एनडीटीव्ही १७७ २१६ १५०

हेडलाइन्स टुडे १८० १९१ १७२

प्रत्यक्ष निकाल १५९ २६२ ७९

२०१४

वाहिनी-एजन्सी एनडीए काँग्रेस+ अन्य

एबीपी न्यूज-एसी नीलसन २८१ ९७ १६५

टाइम्स नाऊ-ओआरजी २४९ १४८ १४६

सीएनएन आयबीएन २८० ९७ १६६

हेडलाइन्स टुडे २७२ ११५ १५६

चाणक्य ३४० ७० १३३

इंडिया टीव्ही २८९ १०१ १५३

एनडीटीव्ही २७९ १०३ १६१

प्रत्यक्ष निकाल ३३६ ५९ १४८

२०१७ उत्तर प्रदेश (विधानसभा)

वाहिनी-एजन्सी एनडीए काँग्रेस-सपा बसप

इंडिया टुडे-एक्सिस २६५ ३५ ३५

सीव्होटर १६१ १४१ ८७

एबीपी सीएसडीएस १७० १६३ ६७

न्यूज एक्स एमआरसी १८५ १२० ९०

टुडेज चाणक्य २८५ ८८ २७

प्रत्यक्ष निकाल ३२५ ४७ १९



Translate »