मनोरंजन
कार्तिक-साराचा ‘खुल्लम खुल्ला प्यार’; इन्स्टाग्राम पोस्टवरून दिली कबुली
बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. अर्थात या जोडीने आजपर्यंत जाहीर कबुली दिली नसली तरी अनेकदा हे दोघं एकत्र दिसतात. साराला भेटण्यासाठी जाताना कार्तिकने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर तोंडसुद्धा लपवलं होतं. पण आता कार्तिकने ‘खुल्लम खुल्ला प्यार’चा मार्ग अवलंबल्याचं दिसत आहे. यासाठी निमित्त ठरला साराचा वाढदिवस.
सोमवारी साराने तिचा २४वा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण दिवसभर तिला सोशल मीडियावरून चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत होत्या. पण हे सेलिब्रेशन पूर्ण झालं कार्तिकच्या इन्स्टाग्राम पोस्टने. साराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्तिक थायलंडला गेला. तिच्यासोबत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘राजकुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ईद मुबारक (पण यावेळी कोणत्याही मास्कशिवाय)’ अनेकदा तोंड लपवून साराशी भेटणारा कार्तिक आता मोकळेपणाने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.
कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका कार्यक्रमात रणवीर सिंगने साराची ओळख कार्तिकशी करून दिली. आता कार्तिक आणि सारा लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. ‘लव्ह आज कल’च्या सिक्वलमध्ये या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.