Menu

देश
शपथविधीनंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ

nobanner

शनिवार सुट्टीचा वार समजून सुस्तावलेल्या सगळ्यांचीच झोप उडवणारी गोष्ट आज सकाळी घडली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची राजभवनात राज्यपालांच्या उपस्थिती शपथ घेतली. यानंतर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ पाहायला मिळाला.

24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकासआघाडी अंतर्गत सत्ता स्थापनेकरता प्रयत्न सुरू असतानाच 23 नोव्हेंबरचा दिवस उजाडला तो ‘राजकीय भूकंप’सहीतच. अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन शपथविधी केल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ता नाराज झाले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेदेखील हा सर्वात मोठा धक्का होता. यानंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ घालत आहे. या memes वर एक नजर टाकूया….