Menu

देश
शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

nobanner

राज्यात अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी तातडीची मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर जाहीर केले. राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या २ ते ३ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.