सातत्याने युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने पीओकेमधील बाघ आणि कोटली सेक्टरमध्ये दोन हजार तुकडया तैनात केल्या आहेत. नियंत्रण रेषेजवळ असणाऱ्या भागामध्ये पाकिस्तानने ही सैन्य तैनाती केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. नियंत्रण रेषेपासून ३० किलोमीटरच्या भागामध्ये या सैनिकांना तैनात केले आहे. भारतीय लष्कराचे पाकिस्तानच्या या...
Read Moreमुसळधार पावसामुळे बुधवारी मध्य रेल्वेसेवा ठप्प झाली. मात्र, ठाण्याहून कर्जत आणि कसारा दिशेने जाणाऱ्या गाडय़ा सुरू असल्याने मुंबईतून घरी परतणाऱ्या प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने, रेल्वे रुळांवरून पायपीट करत ठाणे स्थानक गाठले. ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये...
Read Moreकाँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना मंगळवारी ईडीने अटक केली होती. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत. “शिवकुमार यांना करण्यात आलेली अटक म्हणजे द्वेषाच्या राजकारणाचं आणखी एक उदाहरण आहे”, अशी टीका राहुल यांनी मोदी सरकारवर केली आहे....
Read Moreस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. पुण्याला जात असताना राजू शेट्टी यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंना तुम्ही भाजपात जाऊ नका अशी विनंती केली. “तुम्ही शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, लोकसभेत शेतकऱ्यांसह जनसामान्यांचा आवाज उठवावा. तसंच सध्या महाराष्ट्राची...
Read Moreगणेश मंडळाच्या नावाखाली जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मंडळांवर पोलिसांची नजर राहाणार असून यासाठी गणवेश परिधान ने केलेली पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई यंदा १९८ सार्वजनिक आणि दोनशेच्या आसपास सोसायटी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या गणेश मंडळांची नोंद पालिकेत असते...
Read Moreमुंबई आणि कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच कोकण रेल्वेच्या मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने तुर्तास हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक सध्या बंद असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान...
Read Moreविरारमध्ये २० ऑगस्ट रोजी एका ११ वर्षीय चिमुकल्याने मोठय़ा धाडसाने एका चोराला पकडून दिले होते. या चोराकडून पोलिसांनी तपास करत १७ गुन्ह्यची उकल केली आहे. या चोरापासून जवळपास १० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. विरार पश्चिमेला राहणाऱ्या तनीष महाडिक याने २० ऑगस्ट रोजी मोठे धाडस दाखवले होते, तनीष...
Read Moreदेशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेही “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते.” असे सांगत मोदी सरकारच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. “वाईट काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेची मशागत केली हे मान्य करावे...
Read Moreमुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. मात्र त्यानंतर शनिवार आणि रविवारी मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात आरेमध्ये मानवी साखळी करुन निषेध व्यक्त केला....
Read Moreजगातील सर्वात मोठ्या अॅमेझॉन जंगलात गेल्या काही दिवसांपासून भीषण आग लागलेली आहे. याचा परिणाम तेथील शहरांवर जाणवत असून २० टक्के ऑक्सिजन याच जंगलातून अवघ्या जगाला मिळतो. मात्र, तेच जंगल आज धुमसत आहे. परिणामी, अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, जंगल संवर्धन केले पाहिजे असा संदेश घरगुती गणपतीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवमधील...
Read More