Menu

देश
ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच निधन

nobanner

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या आहे.
मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘नवरा बायको’, ‘माल मसाला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ इत्यादी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.

मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. यामध्ये ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.