Menu

देश
नाशिकच्या झोपडपट्टीत भीषण आग; सात गॅस सिलिंडरचा स्फोट

nobanner

नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली असून या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर एकामागोमाग एक सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील रहिवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील संतप्त रहिवाश्यांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे.

नाशिकच्या गंजमाळ येथील भीमवाडीत सकाळी साडे नऊच्या सुमारास ही लागली. भीमवाडी झोपडपट्टीत पत्रे आणि लाकडांची घरे असल्याने आगीने भराभर पेट घेतला. त्यातच काही घरांमधील सहा ते सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. अचानक लागलेल्या या आगीमुळे भीमावाडी झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी जीवमुठीत घेऊन तात्काळ घराबाहेर धाव घेतली. तर वस्तीतल्या काही तरुणांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीने अधिकच रौद्ररुप धारण केल्याने २० ते २५ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अवघ्या दहा मिनिटातच आगीचे आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील लोक भयभीत झाले. नाशिक पालिका आणि नाशिक रोड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मात्र, येथील चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अग्निशमन दलालाही आग विझताना प्रचंड अडचणी येत होत्या. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी सात घरांवर उभे राहून वेगवेगळ्या बाजूने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीड तास होऊनही आग विझवली जात नसल्याने स्थानिकांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केली. ही आग विझवत असताना पत्र्याच्या घरावरून पाय घसरल्याने खाली पडल्याने अग्निशमन दलाचे जवान जगदीश देशमुख हे जखमी झाले. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, या आगीत स्थानिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. केवळ अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडल्याने या लोकांचा जीव वाचला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथील नागरिकांचे संसार मात्र नेस्तानाबूत झाले आहेत. आगीत ज्यांची घरे जळून खाक झाली आहेत. त्या सर्वांची तात्पुरती बी. डी. भालेकर शाळेत निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माणसांबरोबर येथील जनावरांनाही या आगीचा मोठा फटका बसला आहे. या आगीत एक गाय जखमी झाली आहे. तर आग लागल्यानंतर १४ गायी, ३० म्हशी आणि ७० बकऱ्या गोठ्यातून पळाल्या.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.