Menu

देश
मोदी सरकारने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींची मदत केली-फडणवीस

nobanner

केंद्र सरकारने करोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही असा आरोप केला होतो. आत्तापर्यंत ५ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं भासवलं जातं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने काय काय केलं?

महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडल्या

श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी दिले

मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी दिला

पीपीई आणि एन ९५ मास्क यांचा पुरवठा केला

शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला

एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला

गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ दिली गेली

जनधन योजनेचे १३०८ कोटी दिले गेले

उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.