Menu

तीन वर्षापूर्वी टेनिस बॉल बॉलर होता Umran Malik, मित्रामुळे पालटलं नशीब

New Project (24) (19)
nobanner

नवी दिल्ली, 18 एप्रिल: आयपीएलच्या यंदाच्या महकुंभात सध्या जम्मू काश्मिरचा पठ्ठ्या उमरान मलिकच्या (Umran Malik ) नावाचा जयजयकार पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच मलिक मैदान गाजवताना दिसत आहे. पंजाबविरुद्ध खेळताना त्याने अखेरच्या ओव्हरमध्ये कहरच केला. त्याने शेवटच्या षटकात एकही धाव न देता 4 विकेट्स घेतल्या. त्याची ही शानदार कामगिरी पाहता क्रिकेट जगतात सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.

पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना 19 व्या षटकापर्यंत 151 धावा कुटल्या होत्या. त्यांनी शेवटच्या षटकात एकही धाव घेता आली नाही. विशेष म्हणजे, त्यांनी या षटकात आपले 4 फलंदाज गमावले. हैदराबादकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक आला होता. त्याने शेवटच्या षटकात एकही धाव न देता 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये शेवटचे षटक निर्धाव षटक टाकणारा चौथा खेळाडू ठरला.

अशातच मशहूर कमेंटेटर हर्षा भोगले यांनी ट्विट करत मलिकच्या गोलंदाजीमागील रहस्य सांगितले आहे. उमरान मलिक 2018-19 पर्यंत टेनिस बॉलचा खेळाडू होता. म्हणजे हा 22 वर्षीय गोलंदाज त्याच्या जम्मू-काश्मीर राज्यात टेनिस बॉल स्पर्धा खेळत असे. त्यानंतर त्याचा मित्र आणि हैदराबाद संघातील सदस्य अब्दुल समदने मोठा निर्णय घेतला.



Translate »