देश
मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं, 24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू; असा असेल मार्ग आणि वेळापत्रक
मुंबईकरांचा प्रवास म्हटलं की अनेकांनाच ही बाब म्हणजे तारेवरची कसरत वाटते. शहरात नव्या आलेल्या व्यक्तींना तर, हे गणित उमगण्यास बराच वेळ द्याला लागतो. अशा या मुंबई शहराचा वेग आता खऱ्या अर्थानं आणखी वाढणार आहे. कारण, शहरातील मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं लवकरच लोकार्पण होणार आहे.
विनोद तावडे यांनी X च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार 24 जुलै 2024 रोजी मुंबई शहरातील पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार असून, मुंबईकरांना या मार्गानं प्रवास करता येणार आहे. या मेट्रोच्या मार्गामुळं शहरातील नागरिकांचा प्रवास खऱ्या अर्थानं सुसाट होणार आहे. तावडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळं भूमिगत मेट्रोचं एकंदर रुप कसं असेल, हा प्रवास कसा असे याची कल्पना येत आहे. ज्यामुळं नागरिकांनी आतापासूनच या प्रवासासाठी उत्सुकता दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे.