देश
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-AC ऑटोमॅटिक ‘बंद दरवाजांची’ ट्रेन
धावत्या लोकल ट्रेनमध्ये दरवाज्यांना लटकने आता बंद होणार आहे. कारण मुंबईकरांच्या सेवेत पहिली नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची बंद होणारी लोकल ट्रेन दाखल होणार आहे. येत्या 2 दिवसात ती मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
लोकलमधून पडून अनेकांनी जीव गमावले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने प्रशासनांने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे.
या नव्या लोकल ट्रेनची निर्मिती चेन्नई मध्ये करण्यात आली असून 12 डब्यांची हि ट्रेन लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर 2025 मध्ये सांगितलं होतं की, मुंबईकरांच्या सुरक्षेच्या हेतूने उपनगरीय रेल्वे जाळ्यावर टप्प्याटप्प्याने ‘बंद दरवाजांच्या’ लोकलाचा वापर सुरू करण्यात येणार आहे.
रेल्वेने याकरीता तीन प्रयोग हाती घेतले आहेत. पहिला प्रयोगमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व लोकल गाड्यांना (जुने डबे) नवीन प्रकारचे दरवाजे बसवणे.
दुसरा प्रयोगमध्ये सध्या ज्या ‘नॉन-एसी’ गाड्या आहेत त्यांना सर्व ‘बंद दरवाजांच्या’ राहणार आहे. साहजिकच, ज्या ‘एसी’ गाड्या तयार होतील, त्या देखील ‘बंद दरवाजांसह’च असणार आहे.
भविष्यात‘एसी’ असो वा ‘नॉन-एसी’, सर्वच लोकल गाड्यांना ‘बंद दरवाजे’ असावे यादृष्टीने रेल्वेने काम हाती घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नॉन एसी बंद दरवाजांची लोकल ट्रेन सोलापूर मार्गे उद्यापर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. ही ट्रेन थेट मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात येणार आहे. इथे सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर त्या मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.