Headlines

मान्सूनने वाढवली चिंता! फक्त ‘या’ दोन जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा, तर, उर्वरित राज्यात…

 

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून पतियाला, नजीबाबाद येथे ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. उत्तर प्रदेशापासून कमी दाब क्षेत्रापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कायम असतानाच दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड ते कमी दाबाचे केंद्र या दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

 

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने म्हटलं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचपर्यंत चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही प्रणाली जमिनीकडे येण्याची शक्यता आहे.

जुलै,ऑगस्ट महिन्यात दमदार पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात पाऊस बरसणार आहे. 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान विदर्भात दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला  या दरम्यान  पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात  पावसाचा येलो अलर्ट आहे.

मुंबईत पाऊस का कमी?

अरबी समुद्रातील किनारपट्टीवर अनुकूल वारे वाहत नसल्याने आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली कमकुवत राहिल्यामुळे मुंबई शहर व किनारपट्टीच्या भागात नेहमीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *