Headlines

‘ते मला लोकलमधून फेकणार होते…’; अंबरनाथ-CSMT लोकलमध्ये काय घडलं? तरुणाने सांगितला घटनाक्रम, हल्ला कोयत्याने नव्हे तर…

मुंबई लोकलमध्ये एकावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सुरुवातीला या प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. मात्र हल्ला करण्यासाठी आरोपींनी धारदार शस्त्र वापरले नसल्याचे पीडित तरुणाचे म्हणणे आहे. तसंच, हा हल्ला का करण्यात आला याचेदेखील कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या ठाकूर्लीदरम्यान रेल्वेच्या लगेज डब्यात दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या दोघंही गंभीर जखमी झाले होते. तसंच, सुरुवातीला दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र पीडित तरुणाने धारदार शस्त्राने नव्हे तर आरोपींनी हातातील कड्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. हाताततील कड्याने मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहे.

नेमकं काय घडलं?

सीएसएमटीवरून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यामध्ये सीटवर बसण्यावरून आपआपसाद वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याने यामध्ये राजू वाघे, साहिल संदारे हे दोघेजण जखमी झाले. लोकलने डोंबिवली स्टेशन सोडल्यानंतर राजू वाघे आणि साहिल खंदारे हे लगेच डब्याच्या सीटवर झोपले होते. त्यावेळेस तीन ते चार तरुण तिथे आले आणि त्यांनी बसण्याच्या जागेवर त्यांना हातात असलेल्या कड्यांने मारहाण करायला सुरुवात केली.

मला मारहाण केल्यानंतर ते मला लोकलमधून फेकणार होते. पण तेव्हा ट्रेन ठाकुर्लीला थांबली. तेव्हा तीन ते चार जण चढले. तेव्हा मला वाचण्यासाठी एकजण पुढे आला. तेव्हा त्यालाही त्या टोळक्याने मारहाण केली, असं जखमी राजू वाघे यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने सायन हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान रेल्वेच्या डब्यात खून ,खुनाचे प्रयत्न, हाणामारी यासारख्या गंभीर घटना घडत असताना रेल्वे प्रवासी आता स्वतःला सुरक्षित समजत आहेत. लोकलच्या फेऱ्या कमी आहेत, त्या मानाने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गर्दीत एका दुसऱ्याला धक्का लागने, बसायला जागा न मिळणं, या कारणांवरून अशा घटना घडत आहेत. त्यामुळे काही प्रवाशांनी तर गर्दीच्या वेळा टाळत दुसऱ्या वेळी कामावर जाणं सुरू केल्याची माहिती प्रवाशांनी दिली. तर रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात किंवा सर्वच्या सर्व लवकर पंधरा डब्याच्या कराव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *