Headlines

लाचेसाठी पार ‘लाज’ सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

गांजा सापडणे, मोबाईल सापडणे, कैद्यांच्या हाणामारी अशा अनेक प्रकारांमध्ये अक्षरश: बदनाम झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा जेलमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यानेच कैद्याला 40 हजार लाच घेत खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. लाचेसाठी लाज सोडल्याचा प्रकार एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडून घडला आहे.

अर्धनग्न अवस्थेमध्ये खाकी वर्दीतच व्हिडिओ कॉल

या संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप होत आहेत.या महिला पोलीस अधिकाऱ्याने दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सेवा बजावली होती आणि आता सध्या बंगळूरमध्ये कर्तव्यावर आहे. त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार ही महिला पोलीस अधिकारी दोन वर्षांपूर्वी हिंदलगा जेलमध्ये सेवेमध्ये होती. त्यावेळी या महिलेने  जेलमधील कैद्यांकडून पैशाच्या मोबदल्यामध्ये घरचं जेवण देणं, तसेच एका कैद्याकडून 40 हजारांची लाच स्वीकारत त्याला अर्धनग्न अवस्थेमध्ये खाकी वर्दीतच व्हिडिओ कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगावरील वर्दी उतरतानाचे संपूर्ण दृश्य व्हिडिओत चित्रित झाले आहे. जेलमधील अनेक कैदी तिच्या संपर्कात असल्याचा सुद्धा गंभीर आरोप कैद्याने लोकायुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. मात्र, भीतीच्या कारणाने कैदी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचा सुद्धा म्हटलं जात आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. मात्र आता हा प्रकार उघडकीस आला आहे.

जेलमध्येच वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा गंभीर आरोप

सुरेश उर्फ साईकुमार नावाच्या कैद्याने लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. तो 2024 पर्यंत हिंदलगा जेलमध्ये होता. त्याने जेलमध्येच वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तो म्हणाला की तुरुंग अधिकारीच स्वतःच्या तुरुंगामध्ये वेश्याव्यवसाय चालवतात आणि या अवैध कृत्यांचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं सुद्धा म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर तुरुंगातील अधिकारीच कैद्यांना पैशाच्या बदल्यामध्ये मोबाईल, सिम कार्ड, दारू आणि गांजा यासारख्या गोष्टी पुरवत असल्याचे आणि विकत असल्याचे सुद्धा त्याने म्हटलं आहे. पैशाच्या जोरावर चैनीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, असा गंभीर आरोप सुद्धा केला आहे.

अधिकारीच मोबाईल कैद्यांना विकत असतात

त्यानं म्हटलं आहे की, तुरुंगामध्ये जात असताना कैद्यांची अत्यंत कडक तपासणी केली जाते, तरीही त्यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचतात. हे अधिकारीच मोबाईल कैद्यांना विकत असतात. नंतर कैद्याच्या उशीखाली मोबाईल सापडल्याचे दाखवून त्यांच्यावरती खोटे एफआयआर दाखल करतात, असा आरोप सुद्धा या कैद्याने केला आहे. जेलमधील भ्रष्टाचाराविरुद्ध कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर वरिष्ठ अधिकारीच प्रकरण दाबून टाकतात, असं सुद्धा त्याने म्हटलं आहे. साधारणपणे जर कोणी दोषी आढळत नसेल, तर त्याला 3 महिन्यांसाठी निलंबित केलं जातं आणि पुन्हा सेवेत रुजू करून घेतलं जातं, असं सुद्धा त्याने म्हटलं आहे. या कैदी सुरेशने यापूर्वी सुद्धा हिंडलगा जेलमधील अनेक व्हिडिओ प्रसिद्ध करत या अवैध कारभाराचा पर्दाफाश केला होता. मात्र त्याला अधिकाऱ्यांकडून धमक्यासुद्धा मिळाल्या होत्या. आता त्याला तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर एक आठवड्यामध्येच कुणिगल पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *