महाराष्ट्रात पावसाची स्थिती चिंताजनक, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना मात्र दिलासा, विजांसह वादळी पावसाचा अलर्ट
ऑगस्टमध्ये कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाला पोषक वातावरण आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपासून कर्नाल, हरदोई पासून तीव्र कमी…
