Headlines

Solapur Crime : काळीज पिळवटूण टाकणारी घटना, मदरशामध्ये मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

 अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात एका मौलाना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  मदरशात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवैन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला याप्रकरणी आरोपी मौलाना मोहम्मद उमर रिजवी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सोलापुरातील एका मदरशा मध्ये मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला  आहे. मोहम्मद उमर रझवी हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून सोलापूर शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम करत होता. 53 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय चिमुकली सोबत केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. सदरच्या मौलाना विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं, पोलिसांनी सविस्तर सांगितलं? 

एम. राजकुमार पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सोलापूर शहरात अंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं.  त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळील जिंदगी भागात एक मदरसा आहे. तेथे शिक्षण देणारे जे मौलाना आहेत त्यांनी त्यांच्या मुलीला चुकीचा  स्पर्श केला होता. म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोप आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला तब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार चौकशी केली आहे. या प्रकरणात आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये बीएनएस 74 78 पोस्को कायद्याच्या आठ 10 12 आणि जुनल जस्टीस ्टच्या 75 कलमांय गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकी केली आहे. मंगळवारी या आरोपी आदरणीय कोर्टासमोर हाजर करून दोन दिवस पोलीस कस्टडी मिळालेला आहे त्याच्यावर पुढील तपास चालू आहे.

घटना कशी आणि कुठे घडली? 

फक्त जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरवून सोडणारी घटना सोलापुरात घडलीय. सोलापुरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. सोलापूर शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यातूनही विशेष म्हणजे मदरशामध्ये धार्मिक शिक्षणाचे धडे देणारा मौलानानेच हे सार गैरकृत्य केल आहे. मोहम्मद रझवी असं 53 वर्षीय मौलानाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आली आहे. एका पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असून त्याच्यावर सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील एका पवित्र ठिकाणीच अशा पद्धतीची घटना घडल्याने मदरशामध्ये आपल्या पाल्यांना पाठवणाऱ्या पालकांचा थरकाप उडालाय. संताप येणाऱ्या या गैरकृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच स्तरातून संतापाची लाट उमटत आहे. मौलानानं केलेला हा एक प्रकार आता समोर आलाय यापूर्वी आणखी काही अशा अप्रिय घटना घडलेल्या आहेत का? पिडीतांची संख्या वाढू शकते का ? या सर्वांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत. बदनामी करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आता सोलापूरकरांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *