Headlines

भारत, पाकिस्तानपासून ते चीनपर्यंत 5,000 km लांब ढगांचा मोठा पट्टा; मान्सूनचा नवा पॅटर्न; सॅटेलाईट फोटो पाहून हवामान तज्ञ शॉक

 सध्या भारतासह आशियातील अनेक देशांना मान्सूनचा मोठा फटका बसला आहे. अशातच  भारताच्या अत्याधुनिक हवामान उपग्रह, INSAT-3D ने कॅप्चर केलेले छायाचित्र पाहून हवामन तज्ञ अचंबित झाले आहेत. भारत, पाकिस्तानपासून ते चीनपर्यंत 5,000 km लांब ढगांचा मोठा पट्टा तयार झाल्याचे छायाचित्रात दिसत आहे. येत्या काही दिवसात हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. उद्या 13 ऑगस्ट 2026 रोजी 15 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

मान्सूनचा नवा पॅटर्न

INSAT-3D सॅटेलाईटच्या माध्यमातून ढगांचे निरिक्षण करुन हवामानाते विश्लेषण केले जात आहे. आता  भारत, पाकिस्तानपासून ते चीनपर्यंत 5,000 km लांब ढगांचा पट्टा तयार झाल्याचे सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहे. हा ढगांचा पट्टा मान्सूनच्या प्रवाहाशी संबंधित खोल संवहन  हवा वर जाण्याची प्रक्रिया मानली जात आहे.  यामध्ये ढगांचे समूह आहेत, जे अनेक ठिकाणी वादळ आणि पाऊस सोबत घेऊन पुढे सरकत आहेत. विंडीने याची उपग्रह छायाचित्रे शेअर केली आहेत.

हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेली एक विशाल वातावरणीय प्रणाली

दक्षिण आशियाई मान्सून हा हिंद महासागराकडून आशियाकडे होणाऱ्या बाष्प आणि हवेच्या प्रवाहांच्या मोठ्या प्रमाणावरील हालचालींमुळे निर्माण होतो. मान्सूनच्या हंगामात, दमट हवेचे प्रवाह उपखंडात पोहोचतात. जड आणि विशाल ढग उंच हवेत तरंगतात. यामुळे पर्जन्यवृष्टी करणाऱ्या प्रणाली तयार होते. मान्सूनच्या 5,000 किलोमीटर लांबीच्या ढगांच्या पट्ट्यासाठी उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे अत्यंत महत्त्वाची आहेत.  सक्रिय मान्सूनच्या हंगामात हवामान प्रणाली एकमेकांवर किती अवलंबून असतात हे पट्टा दाखवतो. जमिनीवरील पाऊस जरी एखाद्या शहरापुरता किंवा राज्यापुरता मर्यादित असल्याचे दिसत असले, तरी उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे त्यामागील वातावरणीय घटनांची संपूर्ण प्रक्रिया दर्शवतात.

13 ऑगस्ट 2026 हवामान कसे असेल?

देशात मान्सून अत्यंत सक्रिय आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागांवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनचा पट्टा सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमधून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारत आहे. महाराष्ट्रा,  हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरातसह 15 राज्यांना IMD ने अलर्ट दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *