Headlines

एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांना पितृशोक, वयाच्या 96 व्या वर्षी नंदकिशोर गोयंका यांनी घेतला अखेरचा श्वास

एस्सेल परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळलाय. भारतातील प्रसिद्ध मीडिया उद्योजक आणि झी समूहाचे (एस्सेल ग्रुप)चे अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. मुंबईतील वसंत सागर इथे  श्री.नंदकिशोर गोयंका यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. श्री.नंदकिशोर गोयंका यांचं सोमवारी दुपारी साडेबारा वाजता निधन झालं. श्री.नंदकिशोर गोयंका यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्री नंदकिशोर गोयंका यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मरीन ड्राइव्ह येथील वसंत सागर, ए रोड या निवासस्थानी ठेवण्यात आलंय. बातमी कळताच अनेक दिग्गज त्यांच्या राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी पोहोचत आहेत.

28 सप्टेंबर 1930 रोजी जन्मलेले श्री नंदकिशोर गोयंका हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तसंच महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्रोहाच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आईचेही अंत्यसंस्कार हे अग्रोहामधील गोयंका उद्यानमध्ये करण्यात आलं होतं.

श्री. नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव मंगळवार, 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातील त्यांच्या मूळ गावी हिसार येथे घेऊन जाणार आहे. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव 166, गोयंका हाऊस, कृष्णा मंडी, हिसार येथे ठेवलं जाणार आहे.

श्री. नंदकिशोर गोयंका यांच्यावर बुधवारी 15 जुलैला सकाळी 11 वाजता हरियाणातील हिसार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अग्रोहा धाम येथील गोयंका उद्यानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याच अग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *