Headlines

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रक्षाबंधनापासून 15 दिवसांचा मोठा ब्लॉक

मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रक्षाबंधन सणापासून मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मोठा ब्लॉक असणार आहे. टिटवाळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. टिटवाळ रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकल गाड्यांन थांबा देण्यासाठी हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला शुक्रवारी  रात्रीपासून पुढील 15 दिवस मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. पुढील 15 दिवस मध्य रेल्वे मार्गावर 6 तासांचा ब्लॉक असणार आहे. 11 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत हा विशेष ब्लॉक असणार आहे.

कधी आणि कुठे असणार पॉवर ब्लॉक?

मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितलं की, 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक रात्री 11.30 ते पहाटे 5.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक कल्याण आणि वासिंद स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ ईशान्य दिशेकडे असणार आहे. ब्लॉक दरम्यान टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा नसले, स्पष्ट करण्यात आलं आहे.

रक्षाबंधनाला या लोकल असणार रद्द

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10.00, 10.50 आणि 11.42 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी- टिटवाळा लोकल.
  • टिटवाळा येथून 9.00 आणि 10.06 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल.
  • टिटवाळा येथून 11.14 वाजता सुटणारी ठाणे लोकल
  •  आसनगाव येथून 11.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल.

29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी रद्द होणाऱ्या लोकल फेऱ्या

– सीएसएमटी येथून 10.00, 10.50, 11.16 आणि 11.42 वाजता सुटणाऱ्या लोकल
– सीएसएमटी येथून 8.41 आणि 10.00 वाजता सुटणाऱ्या कुर्ला लोकल.
– सीएसएमटी येथून 8.56 वाजता सुटणारी आसनगाव लोकल
– सीएसएमटी येथून 8.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल
– कुर्ला येथून 5.59 वाजता सुटणारी कल्याण लोकल – ठाणे येथून 5.35 वाजता सुटणारी टिटवाळा लोकल
– सीएसएमटी येथून 12.08 वाजता सुटणारी कसारा लोकल
– टिटवाळा येथून 6.13, 9.00 आणि 10.06 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल आणि 10.25 आणि 11.14 वाजता सुटणाऱ्या ठाणे लोकल
– आसनगाव येथून 11.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल – कल्याण येथून 7.02 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *