Headlines

मुंबईत वृद्धाचा मृतदेह ४ वर्षे ठेवला फ्रीझरमध्ये, तीव्र दुर्गंधी अन्…मुलीच्या ‘त्या’ कृतीने पोलीसही चक्रावले, कारण जाणून बसेल धक्का

मुंबईतील मालाडमधील डे केअर सेंटर लवकरच सुरू होत आहे, असा बोर्ड असलेल्या इमारतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ८० वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह तब्बल चार वर्ष फ्रीझरमध्ये ठेवले होते. इमारतीमधून शेजाऱ्यांना दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी दिवसेंदिवस अतिशय तीव्र होत होती. त्यामुळे परिसरातील लोकांनी पोलिसांना याबद्दल तक्रार गेली. पोलिसांनी घटनास्थळाचे गेट उडल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

नेमकं काय प्रकरण आहे?

मालाड पूर्व इथल्या पॉलिक्लिनिकमधील ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी तपास केल्यावर भयानक सत्य समोर आलंय. पोलिसांनी सांगितलं की, वृद्ध व्यक्तीचा मृत्यू २०२२ मध्ये नैसर्गिक कारणामुळे झाला होता. पण त्यांच्या अचानक जाण्याचा कुटुंबाला शॉक बसला. अशात त्यांनी विचित्र निर्णय घेतला. या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर इंटरनेटचा आधार घेतल्यावर  अमेरिकेतील प्रसिद्ध ‘क्रायोनिक्स’ माहिती शोधली.

पुन्हा जिवंत करण्याची आशा

या तंत्रज्ञानानुसार द्रव नायट्रोजनच्या साह्याने अति-थंड तापमानावर (-१९६ अंश सेल्सिअस) मानवी मृतदेह जतन करण्यात येतो. या तंत्रज्ञानातून भविष्यातील वैद्यकीय विज्ञान प्रगत झाल्यावर त्यांना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात येतं. ही माहिती मिळाल्यावर या कुटुंबाने एका आशेने अमेरिकेतील एका विशेष संस्थेशी अधिकृत संपर्क केला. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन मृतदेह विमानाने अमेरिकेत हलवण्याची तयारी सुरू केली होती.

किती खर्च येतो?

आता अमेरिकेत क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे उपयोग करण्यासाठी खर्च किती येतो. तर तब्बल २८,००० ते ४५,००० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे २५ ते ४० लाख रुपयांचा मोठा खर्च या तंत्रज्ञाना उपयोग कऱण्यासाठी येतो. हा मृतदेह मालाडमधील ज्या क्लिनिकच्या विशेष फ्रीझरमध्ये ठेवला होता, ते क्लिनिक गेल्या महिन्याभरापासून नूतनीकरणाच्या कामासाठी पूर्णपणे बंद होते.

विशेष म्हणजे, या क्लिनिकच्या मुख्य मालकाला किंवा स्थानिक पोलिसांना या फ्रीझरमध्ये ठेवलेल्या मृतदेहाबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती. पण परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला.  त्यानंतर पोलिसांनी तातडीने मृत व्यक्तीचे कौटुंबिक सदस्य, क्लिनिकचे व्यवस्थापन आणि जागेच्या मालकाचे अधिकृत जबाब नोंदवून घेण्यात आला. अशा प्रकारे मानवी मृतदेह कोणत्याही परवानगीशिवाय कित्येक वर्षे फ्रीझरमध्ये ठेवणे कायद्यानुसार वैध आहे की बेकायदेशीर, याबाबत कुरार पोलीस सध्या उच्चस्तरीय कायदेतज्ज्ञांचा कायदेशीर सल्ला घेत असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *