Headlines

मोदींच्या कॅबिनेटमधील केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; काहीतरी मोठं घडणार? आणखी काही मंत्रीही सोडणार पद?

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पडलेली फूट त्याचप्रमाणे दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडून दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत केंद्र सरकारला दिलेलं समर्थन याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता ही शक्यता खरी ठरत असून त्या दिशेने पहिलं पाऊल पडल्याचं दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदलाची सुरुवात झाली असून एका मोठ्या नेत्याने अचानक राजीनामा दिला आहे. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.

कोणी दिला राजीनामा?

 

केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यसभेची मुदत संपल्यानंतर जॉर्ज कुरियन यांना भाजपने पुन्हा नामनिर्देशन न दिल्याने राजीनामा अनिवार्य झाला होता. त्यामुळे नियमानुसार जॉर्ज कुरियन यांनी आपलं पद सोडलं आहे. जॉर्ज कुरियन हे पेशाने वकील आहेत. त्यांनी तिसऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते भारतीय जनता पक्षाचे एक जुने सदस्य असून त्यांची राज्यसभेतील कार्यकाळ संपल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागाला आहे.

अजूनही राजीनामे येणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, जॉर्ज कुरियन यांच्या पाठोपाठ दोन ते तीन अधिक राजीनामे येण्याची शक्यता आहे. लवकरच, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा फेरबदल होण्याची चर्चा जोरात असून नव्याने केंद्र सरकारचं पाठबळ वाढवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेसोबतच तृणमूलच्या बंडखोर खासदारांपैकी काहींना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला एकूण तीन मंत्रिपदं?

सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे केंद्रात राज्यमंत्रीपदी आहेत. या मंत्रि‍पदाबरोबरच आता 13 खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला एक केंद्रीय मंत्रीपद आणि केंद्रीय राज्यमंत्री अशी दोन मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंकडे एकूण तीन मंत्रीपदे असतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हे ऑपरेशन टायगर राबवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील नेते आणि खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रि‍पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. श्रीकांत शिंदेंना पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळू शकतं. याच पद्धतीने तृणमूलच्या फुटीर खासदारांपैकीही काहीजणांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागू शकते असं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *