Dadar BEST Bus Accident: लग्नासाठी गावी जाणार होता पण नियतीने घातला घाला, दादर बस दुर्घटनेत डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील दादर प्लाझा परिसरात झालेल्या भीषण बेस्ट बस अपघाताने दोन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. रोजच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणांचे आयुष्य एका क्षणात संपुष्टात आले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी एक असलेल्या 23 वर्षीय नियाज अहमद शेख याची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. काही दिवसांतच गावी जाऊन लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची होती, पण…
