कोकणवासीयांना राज्य सरकारकडून खुशखबर! गौरी-गणपतीसाठी एसटीच्या जादा बसेस धावणार; कुठून सुटणार बस?
कोकणातील गौरी-गणपती उत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आणि भाविक आपल्या मूळ गावी जातात. यंदाही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) विशेष नियोजन केले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातून कोकणासाठी 5220 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार…
