Headlines

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन… मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

बॉलिवूड सिनेसृष्टीतून (Bollywood) एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे डिस्को डान्सर आणि बीजेपी नेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty)  यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलमध्ये असून, त्यांच्यावर नुकतंच  ऑपरेशन झालं आहे.  त्यांचा रुग्णालयातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) स्वत: कोलकाता येथील खासगी रुग्णालयात गेले.  आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांच्या चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शस्त्रक्रिया पार, चाहते पडले चिंतेत (Mithun Chakraborty Hospitalized after minor Surgery, Suvendu Adhikari Shares Health Update)

मिथुन चक्रवर्ती यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर नेते शुभेंदु अधिकारी यांनी पोस्ट शेअर केली आहे. तसेच अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत  माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, मिथुन चक्रवर्ती यांच्यावर  रात्रीच्या सुमारास ऑपरेशन पार पडलं. अभिनेत्याने स्वत: त्यांना आणि पश्चिम बंगालचे अध्यक्ष आणि  खासदार सामिक भट्टाचार्य यांना माहिती दिली होती.  खरंतर, मिथुन चक्रवर्ती यांना ही बाब उघड पब्लिकमध्ये सांगायची नव्हती.

दरम्यान, सुदैवाने ऑपरेशन  उत्तमरित्या पार पडलं. मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती आता ठीक आहे.  शुभेंदु अधिकारी यांनी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी आशा व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या ऑपरेशनची बातमी समोर येताच, अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  त्यांचे कोट्यवधी फॅन्स आणि  सिनेसृष्टीतील इतर कलाकारांना धक्का बसला. प्रत्येक जण त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करीत आहे.  डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, त्यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया पार पडली? हे अद्याप समोर आलेले नाही.

मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच हिट सिनेमांमध्ये काम केलं.   सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 3 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसेच एका फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढंच नाही तर, 2024 साली भारत सरकारने मिथुन चक्रवर्ती यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *