Headlines

Manoj Jarange Patil: ‘आळस झटकून टाका, पेटून उठा’; 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक, मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस असून त्यांनी उद्यापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकार, विशेषतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

मनोज जरांगे म्हणाले, “संध्याकाळपर्यंत बघू काय होतंय. कुणीतरी आपल्याला भेटायला येईल या आशेवर समाज मोठा होत नसतो. माझं मराठा समाजाला आवाहन आहे. विखे पाटलांनी काल संभाजीनगरला आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की अर्ज नाहीये. तुम्ही अर्ज दिलेले माहितीय मला, पण ते आपल्यालाच उलटं बदनाम करतायत. मराठ्यांमध्ये उदासीनता आहे असं ते म्हणतायत. ते आपल्याला हिणवतायत. तुम्ही घरात बसून राहू नका, बाहेर पडा आपल्या लेकरा-बाळांसाठी. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मुलांचं वाटोळं करू नका. आपल्यातला आळस, मरगळ सगळी झटकून टाका. ज्या मराठ्यांनी अर्ज दिले पण जे स्वीकारले गेले नाहीत त्यांनी या. ज्यांची नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांनी या,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

Manoj Jarange Patil: विखे, फडणवीस, शिंदे तळतळाट घेऊ नका

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, म्हणाले, संध्याकाळपर्यंत बघू काय करतात काही नाही ते, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. ज्यांना भेटायचं ते येतील, माझी क्षमता आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये एकही गोष्ट मागे ठेवणार नाही. देवेंद्र फडणवीस जसे सांगतात तसं विखे बोलत आहेत. ते सांगत आहेत मराठ्यांमध्ये उदासीनता आहे. ज्यांची नोंद सापडली तरी अधिकाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत किंवा अर्ज घेतला नाही त्यांनी अंतरवालीमध्ये या.  आताच चान्स आहे. पाऊस-पाणी नाही, नोकरी नाही. किमान शेतात काही चुकलं नाही तर नोकरीत काहीतरी मिळेल. विखे यांना हे दिसत नाही. कलेक्टरला घेऊन बसतात. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही कलेक्टरला घेऊन न बसता तहसीलदारांना घेऊन बसा. तुम्ही एसडीएमला आणि जात पडताळणी अधिकाऱ्याला घेऊन बसा विखे तुम्ही पागल झालात की मराठे तुम्हाला पागल करायचे आहेत, इथे तुम्ही शहाणे व्हा. मराठे चिडले तर… विखे, फडणवीस, शिंदे तळतळाट घेऊ नका.

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला फडणवीस आणि शिंदे यांनी दिलं, पण…

विखेंना उपसमितीवर आणून ठेवलं. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नये. खालचे मंत्री नीट रहा. मराठा समाजाला फडणवीस आणि शिंदे यांनी दिलं, पण वाटोळं पण करत आहेत. एक वर्ष मी फडणवीस यांना बोललो नाही, शिंदेंना दोन वर्षे बोललो नाही. तुम्ही वाटोळं करत आहात हे तुमच्या ध्यानात आणून देत आहोत,” असे जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange Patil: तुम्ही किती वेड्यात काढणार

विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना जरांगे म्हणाले, “त्याला काहीच माहित नाही. त्याला काहीच कळत नाही. त्यांना कारखाना, त्यातून साखर बारीक का जाड निघाली, गूळ निघाला की ढेकळ निघाला एवढंच कळतं, असे त्यांनी म्हटले. बावनकुळे यांनी केलेल्या एका दाव्याचाही जरांगे यांनी उल्लेख केला. “बावनकुळे 22 लाख म्हटले. यांना विचारलं तर एवढे नसतील ते म्हणाले. अन् तुम्हाला मराठ्यांचा देव व्हायचं? इथे तुम्हाला मराठ्यांच्या उपसमितीचा अध्यक्ष केलं. तुम्ही किती वेड्यात काढणार, किती फसवणार आहात? असा सवाल त्यांनी केला.

Manoj Jarange Patil: नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत

नोंदी 58 लाख आम्ही शोधल्यात. हे मीडियासमोर आम्ही वदवून घेतले होते. यांना 58 लाखांमधील नोंदी कमी करायच्या आहेत,” असा आरोप जरांगे यांनी केला. विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, लाड भाऊ, तुम्ही सावध व्हा. चांगला, योग्य जीआर मराठ्यांना देऊन टाका. नाहीतर तुम्हाला अधिकारामध्ये आम्ही ठेवणार नाही. नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत,” असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. मुंबईतील आंदोलनाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संभ्रम ठेवत नाही. 29 ऑगस्टला अंतरवालीमध्येच आंदोलन होणार. यांनी दिलं नाही तर मुंबईत होणार. पाच टप्प्यात सहा कोटी मराठा मुंबईत जाणार,” असा दावा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *