Headlines

Chhatrapati Sambhajingar Police : 1200 रुपयांत बनावट ग्राहक पाठवला, त्याचा मिस्क कॉल अन् पोलिसांची धाड, अनेक तरुणींची सुटका

महिला आणि मुलींचा वापर चुकीच्या माध्यमातून करुन त्यांचीदेखील पिळवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी सिनेस्टाईल कारवाई पोलिसांनी केली. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एका लॉजमध्ये चुकीचे कृत्य सुरु असल्याची माहिती मिळाली होती. महिलांचा वापर करुन त्यांना देहविक्रीच्या दलदलीत ढकललं जायचं. तसेच त्यांची आर्थिक पिळवणूक केली जायची, अशी देखील माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शहरातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करोडी शिवारात सुरू असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ‘हॉटेल निसर्ग लॉजिंग’वर टाकलेल्या धडक छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली असून, त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील महिलांचा समावेश आहे. एका ग्राहकाकडून १,२०० रुपये उकळून पीडित महिलांना केवळ ५०० रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. याप्रकरणी लॉजमालक, मॅनेजर आणि मदतनीसांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट ग्राहकाचा मिस्क कॉल येताच छापा

पोलिसांनी आदित्य पांडे, रवी पोळ, संजय जाधव या तिघांना अटक केली आहे. तर कमलेश भालेराव, देविदास राठोड हे दोघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोडी शिवारातील हॉटेल निसर्ग लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला १,२०० रुपये देऊन लॉजमध्ये पाठवले. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाचा ‘मिस्ड कॉल’ येताच गुन्हे शाखेच्या पथकाने लॉजवर छापा टाकला.

मॅनेजरसह तिघांना अटक; लॉजमालक फरार

या कारवाईत पोलिसांनी लॉज मॅनेजर आदित्य पांडे आणि मदतनीस रवी पोळ आणि संजय जाधव या तिघांना अटक केली आहे. तर लॉजमालक कमलेश भालेराव आणि देविदास राठोड हे दोघे अद्याप फरार आहेत. तसेच, पोलिसांनी घटनास्थळावरून मनेगाव आणि भालगाव येथील दोन ग्राहकांनाही ताब्यात घेतले आहे. छाप्यादरम्यान मोबाइल फोन, रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य असा एकूण ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे पुढील तपास करत आहेत.

नागपुरात महिला पोलिसांच्या पथकाची कडक कारवाई

दरम्यान, नागपुरातून अशाचप्रकारच्या एका कारवाईची माहिती समोर आली होती. नागपूरच्या गंगा-जमुना परिसरात काही महिला या पुरुषांना आक्षेपार्ह आणि विचित्र हावभाव करुन आकर्षित करायचा प्रयत्न करायच्या. या माध्यमातून त्या अनैतिक व्यवसाय चालवत होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर महिला पोलिसांच्या पथकासह पोलीस परिसरात दाखल झाले. यावेळी आरोपी महिला या पळून जात होत्या. पण महिला पोलिसांनी त्यांना पकडलं. नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी केलेल्या या कारवाईचीदेखील चांगलीच चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *