मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन – चार दिवसांपासून पाऊस धो धो कोसळतोय. मुंबईत आज अवघ्या तीन तासांमध्ये पावसाने कहर केला आहे. पहिलाच पावसाचा फटका मुंबईला बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं कोसळलंय तर भांडुपमध्ये चक्क पावसामुळे रस्ता खचला आहे. या घटनेचा अत्यंत धक्कादायक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
भांडुपमध्ये पावसामुळे रस्ता खचला आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या भलं मोठं झाडंही खाली गाडलं गेलं आहे. तर एका मोठ्या बांधकामाच्या साईट शेजारील मुख्य रस्ता आणि रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळली आहे. या स्त्यावर उभा असलेला टेम्पोही खड्ड्यात कोसळला. भांडुपच्या एलबीएस रोडवरील या घटनेच्या धक्कादायक व्हिडीओ अंगावर काटा आणतोय.
सुदैवाने हा रस्ता खचला तेव्हा कोणीही तिथे नव्हतं. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. तसंच एका टेम्पोशिवाय तिथे इतर कुठलेही वाहनं नव्हती. त्यामुळे मोठं नुकसान झालंय नाहीय. मात्र या रस्त्या खचल्यामुळे शेजारील इमारतींनाही मोठा धोका निर्माण झाला हे मात्र आहे.
मुंबई शहरासह उपनगरांत कोसळधारामुळे अनेक ठिकाणी 100 मिलीमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढील काही तास मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाने दिलं आहे.
दरम्यान पावसामुळे अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर रेल्वे, रस्ते वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेचाही लेटमार्क आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
