Headlines

महाराष्ट्र हादरला! 12 वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं, घरातील बाथरुममध्ये आढळला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह

नसरापूर हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच वर्ध्यातही एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वर्ध्याच्या रोठा शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुपारच्या सुमारास परिसरातच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून आपल्या घरी आली. गावाजवळील शेतातच त्यांचे राहते घर आहे. मात्र त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह शेतात आढळून आला. विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने पीडितेवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी मुलीवर अत्याचार करुन नंतर दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला असावा. शेतातच असलेल्या कोट्याच्या कोठारामध्ये तिचे कपडे फेकून देण्यात आले होते. तर, दुसऱ्या बाजूच्या खोलीतच विवस्त्र अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीचे आई-वडिल घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला या अवस्थेत पाहिल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांनी लगेचच पोलिसांत धाव घेतली. त्यामुळं हा प्रकार उघडकीस आला.

बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडली मुलगी

पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीच्या घरी दोन ते तीन लोक नेहमी यायचे त्यांची माहिती पोलिसांना दिली आहे. माध्या मुलीवर आधी अत्याचार झाला. ती बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. नंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.’

स्थानिक गुन्हे शाखेने चार ते पाच लोकांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सांगण्यात येतेय.  या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय शेतमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली होती. मात्र अशा घटना सातत्याने घडत असल्याने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *