Headlines

मागणी वाढणार! कॅप्टन स्मित यांच्या धाडसानंतर पाकिस्तानी तज्ज्ञ सावध; आखाती देशांना धोक्याचा इशारा

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाचं क्रॅश टाळणारे भारतीय पायलट स्मित मच्छार यांचं जगभरातून कौतुक होत आहे. काहींनी यामागे कट असल्याचा संशय व्यक्त केला. पण पाकिस्तानी पत्रकार आणि भूराजकीय तज्ज्ञ शकील चौधरी यांनी स्मित मच्छार यांनी मच्छार यांचं साहस आणि त्याचे उड्डाण क्षेत्रावर होणारे परिणाम यावर सविस्तर भाष्य केलं. फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेनंतर जगभरात भारतीय वैमानिकांची संख्या वाढेल, असा अंदाज त्यांनी चौधरी यांनी व्यक्त केला.

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या को-पायलटनं विमान ३५ हजार फूट उंचीवर असताना तीक्ष्ण हत्यारानं हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या स्मित यांनी समयसूचकता दाखवत कॉकपिटचं दार उघडलं. त्यामुळे काही कर्मचारी आणि प्रवाशांना आत प्रवेश करून हल्लेखोराला पकडता आलं आणि विमानाचा संभाव्य अपघात टळला. स्मित यांचा को-पायलट ओमानचा रहिवासी आहे. त्याची धार्मिक कट्टर पार्श्वभूमी समोर आली आहे. ९ महिन्यांपूर्वी तो नोकरीत रुजू झाला होता.

ओमानी को-पायलटनं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी अतुलनीय धाडस दाखवलं. या सगळ्याचे हवाई उड्डाण क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबद्दल शकील चौधरी सविस्तर बोलले. ‘आता भारतीय पायलट्सची मागणी वाढेल. तर ओमानच्या पायलट्सकडे संशयानं पाहिलं जाईल. याचा फटका संपूर्ण समुदायाला बसतो. ओमानी आहे म्हणजे कट्टरतावादी असेल या नजरेनं पायलट्सकडे पाहिलं जाईल,’ असा धोका चौधरी यांनी सांगितला.

‘या घटनेमुळे भारतीय पायलट्सला अधिक मागणी निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची मागणी जोमानं वाढेल. कारण चिथावणीखोर भाषेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही, हे दिसून आलं आहे,’ अशा शब्दांत चौधरी यांनी हवाई उड्डाण क्षेत्रातील संधींवर भाष्य केलं.

आखाती देशांचे पायलट आणि घातपाती कारवाया यावर बोलताना चौधरींनी ९/११ चा दाखला दिला. ‘अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर विमानं धडकली, त्यांमध्ये इजिप्त, यूएई, सौदी अरेबियाचे लोक होते. त्यामुळे या दृष्टीकोनातून घटनांकडे पाहायला हवं,’ याकडे चौधरी यांनी लक्ष वेधलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *