Headlines

Monsoon Alert: आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी ‘सुखसरीं’चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती

मान्सून संदर्भात सर्वांना सुखावणारी एक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये मान्सून (Monsoon Alert) दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. परिणामी दक्षिण भारतातून हळूहळू वर सरकत लवकर मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पोहचण्याची शक्याता आहेतर दुसरीकडे आजपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहेमात्र हा मान्सून नसून (Maharashtra Monsoon Update) मान्सूनपूर्व पावसाच्या (Pre-Monsoon Rain) सरी सध्या राज्याभरात कोसळत आहे. किमान 10 जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. अशीही माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहेत्यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत शेतीती पेरण्या  करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहे.

Maharashtra Monsoon Update: किमान 10 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही!

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला असला तरी राज्यभरात पोहचायला त्याला काहीसा अवकाश आहे. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Monsoon Alert : मान्सून दाखल झाल्याचं कसं ठरवलं जातं?

भारतीय हवामान विभाग मान्सून दाखल झाला हे कोणत्या निकषांच्या आधारे ठरवलं जातं, हे अनेकदा बऱ्याच जणांना माहिती नसतं. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात माहिती दिली होती. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी मान्सून दाखल झाला याबाबतचे निकष सांगितले होते.

Monsoon Alert in Kerala : केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे निकष:

1.पाऊस:14 स्टेशन्स पैकी, 60% स्टेशन्सने 2 दिवस 2.5 mm किंवा जास्त पावसांची नोंद करणे (10मे नंतर ),तर दुसऱ्या दिवशी
2.वारे फील्ड: वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे, गती 15-20kts
3.आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2

Monsoon : ते 14 स्टेशन्स कोणते?

केरळमधील 14 स्टेशन्सवर 10 मे नंतर 60  टक्के स्टेशन्सवर 2 दिवस 2.5 mm पाऊस होणं आवश्यक असतं. या 14 स्टेशन्समध्ये मिनिकॉय, अमिनी, थिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टयम, कोची, थ्रिसूर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू, मंगलोर यांचा समावेश आहे.

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सरासरीच्या 106  टक्के पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो.   नैऋत्य  पाऊस मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा (>LPA च्या 106 %). जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  वायव्य भारतात सामान्य (LPAच्या 92-108%), ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (LPAच्या <94%), मान्सून कोर झोन(MCZ)वर सामान्यपेक्षा जास्त (> LPAच्या 106%). होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होतो. आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पोहोचतो.

दरम्यान, गतवर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला होता. मान्सूनचा पाऊस गेल्यावर्षी उशिरानं दाखल झाला होता. गेल्या मान्सूनचा पाऊस उशिरानं दाखल झाल्यानं भारतातील शेतीला मोठा फटका देखील बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *