Headlines

शुभमन गिलच्या पूर्व सह खेळाडूला अटक, टी20 लीगमध्ये मॅच फिक्सिंग करताना पकडला गेला

श्रीलंका प्रीमियर लीगमधील जाफना किंग्स या फ्रेंचायझीचे सह मालक आणि भारताच्या माजी अंडर 19 क्रिकेटरला शुक्रवारी श्रीलंकेच्या भ्रष्टाचार विरोधी पक्षाने अटक केली. तो एका खेळाडूला लाच देत असताना पकडला गेला असून त्यांना मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. ही अटक स्पर्धेचा सहावा सीजन सुरु होण्याच्या काही तास आधी करण्यात आली.  श्रीलंका प्रीमियर लीगमधील या भ्रष्टाचार प्रकरणी संशयितांमध्ये मनजोत कालराचा सुद्धा समावेश आहे. मनजोत कालरा याने 2018 च्या 19 वर्षांखालील (अंडर 19) क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. मनजोत कालरा हा शुभमन गिलचा पूर्ण सहखेळाडू राहिलेला आहे.  त्याला क्रीडा संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नेमलेल्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आणि त्यानंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.

27 वर्षांच्या मनजोत कालराने क्रीडा क्षेत्रातील उद्योजकतेकडे पाऊल टाकून वर्षाच्या सुरुवातीला ‘जाफना किंग्स’ फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक केली होती.  श्रीलंकेच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या स्पर्धेच्या संदर्भात एका खेळाडूला आर्थिक आमिष दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कालरा याच्यावर आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुमारे 10 दिवसांपूर्वी संपर्क साधला गेल्यानंतर संबंधित खेळाडूने दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी ही अटक करण्यात आली. श्रीलंकेचे खेळाडू भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो आणि दुनिथ वेल्लालगे यांनी ही तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. हे तिन्ही खेळाडू ‘जाफना किंग्स’ या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करतात.

एलपीएल 2026 च्या पहिल्या दिवशीच मनजोत कालरावर कारवाई झाली जेव्हा जाफना किंग्सचा संघ गॉल गॅलेंट्समध्ये सामना खेळत होता. पाच संघ असणाऱ्या या स्पर्धेत एकूण 24 सामने खेळवले जाणार असून हा सामना आठ ऑगस्टला संपणार आहे. गेल्या काही काळापासून एलपीएलवर मॅच फिक्सिंग, लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत.

यावर्षीच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या एका न्यायालयाने अजून एका एलपीएल फ्रेंचायझीच्या मालकांना चारवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांच्यावर दंड सुद्धा ठोठावण्यात आला. सदर फ्रेंचायझीच्या मालकाने एका खेळाडूला सट्टेबाजीच्या कारवायांमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. श्रीलंका क्रिकेटने जाहीर केले की, ही स्पर्धा कोणत्याही व्यत्ययाशिवाय नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *