9 पैकी 5 खासदार सोडून गेले तरी…; शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर देण्यासाठी ठाकरेंचा ‘प्लॅन बी’?
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेमधील 9 पैकी पाच खासदार फोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांच्या फुटीच्या बातम्यांच्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोलसाठी आधीच प्रयत्न सुरु झाल्याचं वृत्त आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं पक्षाकडून युद्ध पातळीवर सुरु…
