Headlines

एकनाथ शिंदेनी काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले! सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना शिवसनेत मोठा पक्ष प्रवेश; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

शिवसेना पक्ष कुणाचा? शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाचा वाद  सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.  सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हा बाबत सुनावणी सुरु आहे. असे असताना  एकनाथ शिंदेनी काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले आहे. अमरावतीमधील काँग्रेसच्या 19 नगरसेवकांनी एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे विदर्भात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका झटक्यात सर्व  राजकीय समीकरण बदलणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे 19 नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष तसेच  कर्नाटकातील बेळगाव येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत हा जाहीर पक्ष प्रवेश झाला.

विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट

या प्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा असून विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. राज बोरकर, संदीप मेश्राम, सचिन कुंभारे, केतन सहारे, पंकज बोरकर आणि श्रीकांत रामटेके, प्रहारचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले, बेळगाव तालुका अध्यक्ष दीपक बोधले, युवा अध्यक्ष बेळगाव जिल्हा रोहित पाटील, मांगुर शाखाप्रमुख सुरेश हेमाजे यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

मुंबईत  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे हा पक्ष प्रवेश झाला. नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. “दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची संपूर्ण साथ राहील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  प्रवेश सोहळ्यास विदर्भ आणि कर्नाटकातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत   सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हा बाबत सुनावणी सुरु असताना मुंबईत पक्ष प्रवेश पार पडला. विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसनेते प्रवेश केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *